
देशभरातील तरुणांच्या फिटनेससाठी आदर्श सोमानी यांनी एक आदर्श उपक्रम सुरू केला आहे. सध्या या स्पर्धेचे केंद्र पुण्यातील बालेवाडी हेच असणार आहे. ही स्पर्धा १५ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान होणार आहे. तसेच विजेत्यांना मिळणार एक कोटीहून अधिक रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. या स्पर्धेत विशेष गोष्ट म्हणजे मुला-मुलींना समान बक्षीस मिळणार आहे.
पुणे : ‘बलसागर भारत होवो’ या सानेगुरूजी यांच्या कवितेला साजेसा अभिनव उपक्रम आदर्श सोमानी या संकल्पनेतून साकारत आहे. ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देशभरात एक चळवळ सुरू केली असून, दि. १५ ते १९ एप्रिल २०२३ दरम्यान पुण्यामध्ये बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा उपक्रम होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एक कोटी १५ लाख रूपयांची पारितोषिके देऊन गौेरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागासाठी हे नियम :
‘पुश इंडिया पुश’ या स्पर्धेत १८ वर्षांपुढील नागरिकांनाच सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र ऑनलाईन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग हे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘पुश इंडिया पुश’चे संस्थापक आदर्श सोमानी, मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया, एएफएमसीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल कोतवाल, मुंबई पोलीस महासचालक कृष्णप्रकाश, महाराष्ट्राचे राज्य क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, स.प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रणजीत चामले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांनी केले.
जय हिन्द 🇮🇳 pic.twitter.com/DV6KGcUQzi
— Major Surendra Poonia (@MajorPoonia) August 3, 2022
या दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी केला प्रचार :
सारा अली खान, लारा दत्ता, एनएसजी कमांडो भूषण वर्तक, डॉ. धनंजय मोरे, सुहास खामकर, मनीष अडविलकर आणि अमृता रायचंद अशा स्टार बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ स्पर्धेचा प्रचार केला आहे. ‘पुश अप चॅलेंज’ हा देशवासियांच्या सुदृढ स्वास्थासाठी, शारीरिक ताकद, लवचिकता आणि कठिण प्रसंगांला सामोरे जाण्याचे बळ मिळण्यासाठीचा एक उप्रकम होय.

आदर्श सोमानी यांचा वडिलांच्या स्मरणार्थ उपक्रम :
‘पुश इंडिया पुश’ उपक्रमाचे संस्थापक आदर्श सोमानी यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला प्रारंभ केला आहे. ‘पुश अप’ हा व्यायाम प्रकाराचा प्रसार व्हावा, त्याचे महत्त्व वाढावे आणि बलसागर भारतचे स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होण्यासाठी आम्ही हा खारीचा वाटा उचलत आहोत. ‘पुश अप’ हा भारतीय जीवनशैलीचा भाग व्हावा, यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे, असे आदर्श सोमानी यांनी सांगितले.

देशभरातून १७ हजार नारिकांचा सहभाग :
‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ या स्पर्धेसाठी देशभरातील १७ हजार नागरिकांनी सहभाग निश्चित केला आहे. इच्छुक स्पर्धक अजूनही या वेबसाईटवरून नावनोंदणी करून स्पर्धेत सहभागी होऊ शकता. दररोज स्पर्धास्थळी देखील नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. देशातील २९ राज्यांतील पुरूष आणि महिलांसाठी स्पर्धेत सहभागी होण्याची सारखीच संधी असेल. पुरुष आणि महिला गटातील प्रत्येकी पहिल्या दहा विजेत्या खेळाडूंवर भरघोस बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी नागरिकाला प्रमाणपत्र मिळणार आहे.
