solapur Zp

जिल्हा परिषद पंचायत समितीस्तरावर नियमबाह्य बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे त्या बदल्या त्वरीत रद्द करण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली. 

    सोलापूर : जिल्हा परिषद पंचायत समितीस्तरावर नियमबाह्य बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे त्या बदल्या त्वरीत रद्द करण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली.

    याबाबत संघटनेच्या सरचिटणीस विजया चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जि.प.मुख्यालयस्तरावर ९ आणि ११ मे रोजी समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली. आरोग्य विभागातील कार्यरत काही कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पंचायात समितीस्तरावर शुक्रवारी करण्यात येणार होत्या. कोणत्याही कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी पंचायातस्तरावरून बदली करण्याची मागणी केली नसताना बदल्यांचा प्रस्ताव पं.स.स्तरावर पाठविण्यात आला.

    मुख्यालय स्तरावर आस्थापना असताना पं.स.स्तरावरुन बदली करता येत नसल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या निर्देशनास आणल्या. बदली प्रक्रिया रद्द करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती विजया चव्हाण यांनी दिली.

    मिलिंद शिंदे, सी.टी.पवार, मिलींद गुणपले, शिवराज जाधव, सुरेखा जवळकर यांनी निवेदन दिले आहे.

    दरम्यान, मुख्यालयस्तरावरून १५४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या आत्तापर्यंत करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय १६, विनंती १२७, आपसी१० अशा बदल्या करण्यात आल्या. शुक्रवारी जिल्ह्यातील विविध पंचायात समितीस्तरावर बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली.