Unnatural rape of a youth by the Sangli police

फेसबुकवरून तरुणाशी ओळख करून वकिलाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्या तरुणाचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची मागणी केली.

    पुणे : फेसबुकवरून (Facebook)तरुणाशी ओळख करून वकिलाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्या तरुणाचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची मागणी केली. तसेच, या तरुणाला मायग्रेशनचा त्रास असल्याची बतावणी करून तरुणाच्या आई व पत्नीकडून दागिने घेतले. दागिने फायनान्स करण्यास लावून त्यातून मिळालेल्या पावणे सात लाखांचा अपहार केला आहे.

    याप्रकरणी वकिल दशरथ बावकर (वय २७) याच्यावर अनैसर्गिक अत्याचार, फसवणूक यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, हा प्रकार जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिल दशरथ हे ताथवडे येथील आहेत. तर, तरूण आंबेगाव परिसरातील आहे. तो उच्च शिक्षीत असून, एका कंपनीत नोकरी करतो. त्याची व दशरथ यांची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाले. यादरम्यान, दशरथ याने गोड बोलून तरुणाला भुरळ पाडली. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी या तरुणाला नेहून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. तर, या तरुणाचे नग्न फोटो देखील काढले. ही बाब कोठे सांगितल्यास काढलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्याकडे सात लाखांची मागणी करून पैसे न दिल्यास कुटूंबाला मारण्याची धमकी दिली. तरीही तरुणाने पैसे देण्यास नकार दिला.

    त्यानंतर दशरथने तरुणाला मायग्रेशनचा त्रास असल्याची खोटी बतावणी त्याच्या आईला केली. या तरुणाला आई व पत्नीचे दागिने घेण्यास भाग पाडून ते दागिने पिंपरी येथील एका फायनान्स कंपनीला देऊन त्यांच्याकडून पावणे सात लाख रुपये घेण्यास लावले. त्यानंतर हे पैसे घेऊन त्याचा अपहार केला. तर या तरुणाचा वाहन परवाना, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएम कार्ड धमकावत त्याच्याकडून घेतले. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.