शंभूराज देसाईंनी गुवाहाटीत बसून हलवली सूत्र; ‘ही’ निवडणूकच केली बिनविरोध

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेत बंडखोरी करत मागील 6 दिवसांपासून सुरतमार्गे गुवाहाटी गाठलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढणार आहे. दरम्यान, त्यांचा मुक्काम पुढचे दोन ते तीन दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे.

    सातारा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेत बंडखोरी करत मागील 6 दिवसांपासून सुरतमार्गे गुवाहाटी गाठलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढणार आहे. दरम्यान, त्यांचा मुक्काम पुढचे दोन ते तीन दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी गुवाहाटीमध्ये बसून सातारा जिल्ह्यातील सूत्रे हलवत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपला कारखाना बिनविरोध करून दाखवला आहे.

    शंभूराज देसाई यांचा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक बिनविरोध  करत संचालक झाल्याने त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये अभिनंदन करण्यात आले. याबाबत स्वत: शंभूराज देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. देसाई यांनी फोटोही टाकल्याने त्यांच्यासोबत आमदार एकत्र असल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान, शनिवारी देसाई यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते.