सातारा पालिकेच्या आरक्षण सोडतीत खुल्या गटाची ‘चांदी’

सातारा पालिकेच्या 25 प्रभागांची आरक्षण सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे 50 जागांसाठी 25 महिला व 25 पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.

  सातारा : सातारा पालिकेच्या 25 प्रभागांची आरक्षण सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे 50 जागांसाठी 25 महिला व 25 पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. महिला प्रवर्गात 21 जागा खुल्या तर 4 जागा अनुसुचित जाती व जमातीसाठी तर पुरुष वर्गात 22 जागा खुल्या गटाच्या तर तीन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत.

  प्रभाग क्र १ मध्ये यंदा प्रथमच लोकसंख्या वाढीमुळे अनुसूचित जमातीचे महिला प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने भटक्या जमातीचे नेतृत्व पहिल्यांदाच पालिकेत पोहोचणार आहे. पालिकेच्या आरक्षित अकरा ओबीसी जागांचा निर्णय कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने खुल्या गटांच्या जागांसाठी राजकीय चुरस वाढली आहे.

  नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथील शाहू कला मंदिरात सोमवारी (दि.१३) सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे यावेळी निश्चित करण्यात आली. हद्दवाढ झाल्याने यंदा ५० पैकी २५ महिला व २५ पुरुष पालिकेत निवडून जाणार आहेत. प्रांत मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरूवात झाली.

  मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आरक्षण सोडतीची माहिती दिली. तर निवडणूक निरीक्षक मोहन प्रभुणे यांनी या सोडतीची प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडली. यानंतर सकाळी साडेअकरा वाजता ऐश्वर्या जाधव या शाळकरी मुलीच्या हस्ते आरक्षणाची पहिली चिठ्ठी काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 1, 2, 4, 8, 13 व 15 या सात प्रभागांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण पडले.

  प्रभाग क्र. 1 अ- अनुसूचित जमाती (महिला)
  1 ब – सर्वसाधारण

  प्रभाग क्र 2 अ – अनुसूचित जाती
  क्र 2 ब – सर्वसाधारण महिला

  प्रभाग क्र 3 अ – अनुसूचित जाती
  3 ब- सर्वसाधारण महिला

  प्रभाग क्र 4 अ – अनुसूचित जाती महिला प्रभाग क्र 4 ब- सर्वसाधारण

  प्रभाग क्र 5 अ – सर्वसाधारण महिला 5 ब – सर्वसाधारण

  प्रभाग क्र 6 अ – सर्वसाधारण महिला 6 ब – सर्वसाधारण

  प्रभाग क्र 7 अ – सर्वसाधारण महिला क्र 7 ब – सर्वसाधारण

  प्रभाग क्र 8 अ – अनुसूचित जाती

  8 ब- सर्वसाधारण महिला

  प्रभाग क्र 9 अ – सर्वसाधारण महिला 9 ब – सर्वसाधारण

  प्रभाग क्र 10 अ – सर्वसाधारण महिला 10 ब सर्वसाधारण

  प्रभाग क्र 11 अ – सर्वसाधारण महिला 11 ब – सर्वसाधारण

  प्रभाग क्र 12 अ – सर्वसाधारण महिला 12 ब -सर्वसाधारण

  प्रभाग क्र 13 अ- अनुसुचित जाती महिला 13 ब- सर्वसाधारण

  प्रभाग क्र 14 अ- सर्वसाधारण महिला 14 ब- सर्वसाधारण

  प्रभाग क्र 15 अ- अनुसुचित जाती महिला 15 ब – सर्वसाधारण

  प्रभाग क्र 16 ते 25

  अ- सर्वसाधारण महिला

  ब- सर्वसाधारण.