राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज; तर नंदुबारमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, शेतीचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळं हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास पावसाने हिरावून घेतला. तसेच मराठवाडा-विदर्भ (Marthawada and Vidharbha) भागांवर गारपीटसह पाऊस पडल्यामुळं शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उद्यापासून 15 मार्च ते 17 मार्चपर्यंत राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.

नागपूर– राज्यात मागील आठवड्यात ढगाळ वातावरणासह गारपीट तसेच हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. पश्चिमी विक्षोभामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रभावाने अवकाळीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कमाल तापमान 38 अंशापुढे जात असताना आता 15 मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात (State) सतत हवामान व वातावरण बदलामुळं मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे (Rain) ढग घोंगावत आहेत. मागील आठवड्यात महारा‌ष्ट्रातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळं हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास पावसाने हिरावून घेतला. तसेच मराठवाडा-विदर्भ (Marthawada and Vidharbha) भागांवर गारपीटसह पाऊस पडल्यामुळं शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उद्यापासून 15 मार्च ते 17 मार्चपर्यंत राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच शेतीपिकांबाबत काळजी घेण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे.

गारपीट, पाऊस आणि उष्णता…

दरम्यान, पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठाणे, विदर्भ, मराठवाड तसेच कोकण, मुंबई व उपनगरात ढगाळ वातावरणासाह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यामुळं शेतीचे मोठे नुकसान झाले. राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहे. 123 वर्षांमध्ये यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण ठरला आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीत सरासरी कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअसल नोंदवले गेले आहे. तर मार्चमध्ये कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शेतीचे नुकसान आणि आजार बळवण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसला आहे, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून वातावरणातील (environment) बदल व सातत्याने हवामानातील बदल यामुळं कधी पाऊस, (Rain) तर कधी गारपीठ तर कधी अचनाक थंडी (Cold) सुरु आहे, त्यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होत असून, यामुळं विकाराचे आजार तसेच अन्य आजार हे बळावत चालले आहेत, तसेच राज्यात काही ठिकाणी पाऊव व गारपीठ झाल्यामुळं त्याचा फटका शेती पिकांना बसला आहे.

पिकांची काळजी घ्यावी…

दरम्यान, राज्यातील तापमानात (Tempreture) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून म्हणजे 15 ते 17 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) बांधवांनी पावसाची शक्यता असल्यानं हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.