सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून या वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात सावंतवाडी ,दोडामार्ग, कुडाळ,कणकवली व वैभववाडी तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. सोबत जोराचा वारा व गडगडाटही होताच.या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले आहे(Unseasonal Rain In Konkan).

बळीराजा चांगलाच मेटाकुटीला आला आहे. अनेक ठिकाणी झाडे व विजेचे पोल कोसळून पडले. कणकवलीच्या पट्ट्यात तर या पावसाचा चांगलाच जोर होता.
कणकवली तालुक्यातील काही भागात तब्बल 8 तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. या हंगामात दुस-यांदा या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा, काजूसह कोकम आदी पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.