प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

    तऱ्हाडी (धुळे) : आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने खान्देशातील शेतकऱ्यांच कंबरडं मोडलं आहे. त्यातूनही सावरत शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, कांदे आदीसह भाजीपाला पिकांची लागवड केली असून हे पिके बहरली मात्र आता पुन्हा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

    राज्यातही पावसासाठी पोषक हवामान असल्याने विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला आहे.

    हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

    गत डिसेंबर महिन्यातही राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. अवकाळी पावसाचा फटका राज्यात अनेक भागात बसला. राज्यात गारपीट आणि पावसामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे तसेच फळबागांचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट वारंवार येताना पहायला मिळत आहे. तसेच अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण देखील अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.