संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मोठ्या खंडानंतर ऐन उन्हाळ्यात मंगळवारी पडलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. हा पाऊस अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कोसळला. जोराचा वारा आणि वीजांचा कडकडाट झाला. गतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला.

    अंबाजोगाई : ऐन उन्हाळ्यात पडलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. हा पाऊस अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कोसळला. जोराचा वारा आणि वीजांचा कडकडाट झाला. गेल्या वर्षी पावसाळ्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला.

    यंदा पाण्याचे दुर्भिक्ष फेब्रुवारी, मार्च महिन्यांपासून जाणवायला लागले आहे. अंबाजोगाई तालुक्यासह संपूर्ण केज विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या घशाला कोरड पडली आहे. गतवर्षीचा खरीप व रब्बी हंगाम धोक्यात आला. म्हणावे तेवढे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे यंदा चारा, पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशातच यावर्षी उष्णता अधिक जाणवते आहे.

    यंदा मुबलक प्रमाणात पाऊस पडतो का ते माहीत नाही. अशा वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील गहू यासह विविध काढणीस आलेली पिके आणि आंबा, द्राक्ष, चिक्कू, केळी या फळ पिकांसाठी अवकाळी पाऊस मारक ठरतो. अंबाजोगाई शहर व तालुक्यात मोठ्या खंडानंतर ऐन उन्हाळ्यात पडलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. हा पाऊस अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी कोसळला.

    जोराचा वारा आणि वीजांचा कडकडाट झाला. तालुक्यात नुकसान झाले असल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. हवेत किंचितसा गारवा निर्माण झाला आहे, असे असले तरी या अत्यल्प प्रमाणात पडलेल्या पावसाने गर्मी, उष्णता अधिक वाढणार आहे.