Avakāḷī pāvasācā mukkāma ātā 15 ēprilaparyanta, rājyāta āja kuṭhē āhē iśārā jāṇūna ghyā mahārāṣṭrālā avakāḷī pāvasācā phaṭakā rājyālā basaṇāra avakāḷī pāvasācā phaṭakā; 15 ēprilaparyanta satarkatēcā havāmāna khātyācā iśārā; kōṇatyā ṭhikāṇī kōsaḷaṇāra sarī, vācā savistara nāgapūra: Mahārāṣṭrāta gēlyā āṭhavaḍyācyā akhērapāsūna surū jhālēlā avakāḷī pāvasācā mārā ajūnahī surū āhē. Vādaḷīvāṟyāsaha jhālēlyā gārapiṭīmuḷē rājyāta mōṭhē nukasāna jhālē asatānā havāmāna khātyānē avakāḷīcā mukkāma punhā vāḍhaṇyācā iśārā dilā āhē. Yētyā 15 ēprilaparyanta avakāḷī pāvasācē saṅkaṭa kāyama rāhaṇāra āhē. Daramyāna, āja śukravārī pūrva vidarbhāta vādaḷī pā'ūsa āṇi gārapiṭīcā iśārā, tara marāṭhavāḍā va madhya mahārāṣṭrāta vādaḷī pāvasācā iśārā havāmāna khātyānē dilā āhē. Bhāratīya havāmāna khātyānē āja śukravārīdēkhīla rājyālā pāvasācā iśārā dilā āhē. Yēṇāṟyā 24 tāsāmmadhyē vidarbha, madhya mahārāṣṭra āṇi marāṭhavāḍyāta musaḷadhāra pāvasācī śakyatā vartavalī gēlī. Āja vidarbhātīla candrapūra, gōndiyā āṇi gaḍacirōlī yā tīna jil'hyānnā pāvasācā ‘ŏrēn̄ja alarṭa’ dēṇyāta ālā āhē. Tasēca, bīḍa, lātūra, dhārāśiva, sāṅgalī, parabhaṇī, yavatamāḷa, vāśima, chatrapatī sambhājīnagara va sōlāpurāta vādaḷīvārā āṇi vijān̄cyā kaḍakaḍāṭānsaha pāvasācī śakyatā vartavaṇyāta ālī āhē. Yā jil'hyāta pāvasācā ‘yalō alarṭa’ dēṇyāta ālā āhē. Tara kāhī ṭhikāṇī turaḷaka pāvasācyā sarī kōsaḷatīla, asā andāja āhē. Yā daramyāna rājyāta 30 tē 40 kilōmīṭara pratitāsa vēgānē vārē vāhaṇyācī śakyatā āhē. Madhya mahārāṣṭra āṇi marāṭhavāḍā parisarāvara 1.5 Kilōmīṭara un̄cīvara cakrākāra vāṟyān̄cī sthitī āhē. Tara āgnēya rājasthānamadhīla cakrākāra vāṟyāmpāsūna gujarāta, kōkaṇa, karnāṭaka kinārapaṭṭīparyanta havēcā kamī dābācā sakriya āhē. Budhavārī sāyaṅkāḷanantara bīḍa, akōlā, bulaḍāṇā, parabhaṇī yā jil'hyāmmadhyē vādaḷī pāvasānē hajērī lāvalī. Tara guruvārī nāgapūra yēthē pāvasācyā sarī kōsaḷalyā. Daramyāna, vidarbha, marāṭhavāḍyāsaha rājyācyā bahutānśa bhāgāta ākāśa ḍhagāḷa jhālē āhē. Avakāḷī pāvasāmuḷē vidarbhāta kamāla tāpamānātīla ghaṭa kāyama āhē. Āja, śukravārī vidarbhātīla candrapūra, gōndiyā, gaḍacirōlī yā jil'hyānnā ‘ŏrēn̄ja alarṭa’, marāṭhavāḍyātīla hiṅgōlī, nāndēḍa jil'hyānnā ‘yēlō alarṭa’ dēṇyāta ālā āhē. Tara urvarita vidarbha, marāṭhavāḍā āṇi madhya mahārāṣṭrāta ‘yēlō alarṭa’ dēṇyāta ālā āhē. Show more 2,017 / 5,000 Translation results Translation result Unseasonal rains stay now till April 15, know where the warning is today in the state

  नागपूर : महाराष्ट्रात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेला अवकाळी पावसाचा मारा अजूनही सुरू आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले असताना हवामान खात्याने अवकाळीचा मुक्काम पुन्हा वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. दरम्यान, आज शुक्रवारी पूर्व विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

  महाराष्ट्र राज्याला पावसाचा इशारा

  भारतीय हवामान खात्याने आज शुक्रवारीदेखील राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. येणाऱ्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली. आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, बीड, लातूर, धाराशिव, सांगली, परभणी, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर व सोलापुरात वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

  काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी
  तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. या दरम्यान राज्यात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर आग्नेय राजस्थानमधील चक्राकार वाऱ्यांपासून गुजरात, कोकण, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा सक्रिय आहे. बुधवारी सायंकाळनंतर बीड, अकोला, बुलडाणा, परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. तर गुरुवारी नागपूर येथे पावसाच्या सरी कोसळल्या.

  दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगाळ झाले आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. आज, शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.