अवकाळीचा कहर; साेसाट्याच्या वाऱ्याने द्राक्षबाग जमीनदाेस्त

निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी रामेश्वर निवृत्ती आहेर यांचे एक एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्याने सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे द्राक्ष बाग व द्राक्ष मालाचे नुकसान झाले आहे.

    लासलगाव : अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. शुक्रवारी रात्री लासलगाव जवळील निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथे घडल्याने द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.

    निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी रामेश्वर निवृत्ती आहेर यांचे एक एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्याने सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे द्राक्ष बाग व द्राक्ष मालाचे नुकसान झाले आहे.

    कोरोना काळात अक्षरशः पाच ते सात रुपये किलो दराने मातीमोल बाजार भावाने द्राक्षांची विक्री केली होती यंदा काहीतरी मिळेल या अपेक्षेने द्राक्ष बाग फुलवली अंदाजे १५० ते १६० क्विंटलपर्यंत द्राक्षाचे उत्पादन निघणार होते यातून साडेचार ते पाच लाख रुपयांचे ३० रुपये किलो प्रमाणे उत्पन्न हाती येण्याअगोदरच अवकाळीनंतर आलेल्या वादळी वार्‍याच्या सुलतानी संकटांमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे.

    यामुळे द्राक्ष बाग फुलवण्यासाठी घेतलेले औषध आणि खतांचे दीड लाख रुपये तसेच सोसायटीचे घेतलेले अडीच ते तीन लाख रुपयांचे कर्ज फेडावे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा मोठा प्रश्न या द्राक्ष बागायतदार रामेश्वर आहेर यांच्यासमोर उभा राहिल्याचे ते सांगत आहे.