शिवसेना आगामी निवडणुका लढण्यासाठी सक्षम सघटनात्मक बांधणी करा – आ.रविंद्र फाटक

या बैठकीत संघटना बांधणी, तसेच विकास कामांना निधी शासकीय कमिटीच्या नेमणुका व संघटना बांधणी बाबत येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या.

    कणकवली : आगामी लोकसभा व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्वच निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे. विकासात्मक प्रश्नांसाठी पक्ष तुमच्या पाठीशी आहे. शासकीय कमिट्यावरील प्रशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच केल्या जातील. सर्वांनी गावागावात संघटना बांधणी करावी. आगामी निवडणुकामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदासाठी सर्व उमेदवार आपले असावेत, त्यासाठी आतापासूनच तयारी करा. मी स्वतः पुढच्या महिन्यात पक्ष वाढीसाठी लक्ष घालणार असल्याचा विश्वास शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांनी व्यक्त केला.

    कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे संघटनात्मक बांधणीसाठी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, विधानसभा प्रमुख संदेश पटेल, बबन शिंदे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, योगेश तुळस्कर, राजा गावकर, अमोल लोके, भास्कर राणे, महेंद्र सावंत, शेखर राणे, हरेश पाटील, दिनेश गावकर, सिद्धी शिरसाट, शीतल सावंत, कणकवली महिला तालुकाप्रमुख प्रिया टेमकर, नगराध्यक्ष साक्षी प्रभू शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

    कणकवली, देवगड, कुडाळ, मालवण, वैभववाडी या पाच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटना बांधणी, तसेच विकास कामांना निधी शासकीय कमिटीच्या नेमणुका व संघटना बांधणी बाबत येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. आपल्या कार्यकर्त्यांना मागणी नुसार निधी आणि जिल्हा नियोजन सह शासकीय कमिटी बाबत मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील. तसेच पुढील महिन्यापासून प्रत्येक तालुक्यात मी स्वतः येऊन अडचणी जाणून घेतल्या जातील, असा विश्वास आ.रवींद्र फाटक यांनी व्यक्त केला.