उरणचा वीजनिर्मिती प्रकल्प गॅसवर; अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे सहापैकी चार संच बंद

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ साली उरणचा वायुविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे, मात्र सुरुवातीपासूनच केवळ २.६ ते २.८ क्युबिक मीटर या सरासरीनुसारच गॅसचा पुरवठा होत होता. त्यानंतर मागील काही वर्षांपासून वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी २.५ दररोज क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे, मात्र फक्त सरासरी २.०५ क्युबिक मीटर गॅसचा पुरवठा गेल कंपनीकडून होत आहे.

    उरण : ऐन उन्हाळ्यात नागरिकांची घामाने भिजून काहिली होत असताना विजेच्या टंचाईचे (Electricity Shortage) चटके सामान्यांना सोसावे लागत आहेत. उरणच्या (Uran) बोकडविरा (Bokadvira) ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वायुविद्युत केंद्राला (जीटीपीएस) गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा प्रमाणात गॅस पुरवठाच (Gas Supply) होत नाही. त्यामुळे प्रकल्पातील सहापैकी चार विद्युत निर्मिती संच (Power Generation Set) बंदच ठेवावे लागत असल्याने ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची क्षमता निम्म्याहून अधिक घटली आहे. या घटलेल्या वीज निर्मितीमुळे राज्यातील वीज तुटवड्यात आणखीनच भर पडली आहे.

    जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ साली उरणचा वायुविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे, मात्र सुरुवातीपासूनच केवळ २.६ ते २.८ क्युबिक मीटर या सरासरीनुसारच गॅसचा पुरवठा होत होता. त्यानंतर मागील काही वर्षांपासून वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी २.५ दररोज क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे, मात्र फक्त सरासरी २.०५ क्युबिक मीटर गॅसचा पुरवठा गेल कंपनीकडून होत आहे. मागील काही वर्षांपासून आवश्यकतेनुसार गॅस पुरवठा होत नसल्याने सहापैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पातून आता दररोज २५० ते ३०० मेगावॉट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.

    गेल कंपनीकडून आवश्यकतेनुसार जीटीपीएसला याआधीही कधीही गॅस पुरवठा झालेला नाही.त्यामुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीचे सहापैकी चार संच याआधीच बंद पडले आहेत.उर्वरित सुरू असलेल्या वीज निर्मितीच्या दोन संचासाठी आवश्यक असणाऱ्या २.५ ऐवजी फक्त १.०५ इतकाच गॅस पुरवठा होत आहे.त्यामुळे वीजनिर्मिती केंद्राची क्षमता २५०-३०० मेगावॉट पर्यंत घसरली आहे. त्यामुळे १२२० मेगावॉट वीजनिर्मितीच्या या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला असल्याची माहिती जीटीपीएसचे पीआरओ महेश आफळे यांनी दिली आहे.