koshyari and zakir husain

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो, असे वक्तव्य उस्ताद झाकीर हुसेन यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

    मुंबईः जगातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी (Oldest University In The World) एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) दिलेली पदवी हा आपण थोरामोठ्यांचा कृपाप्रसाद आहे असे समजतो व तो सन्मान आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो असे सत्काराला उत्तर देताना उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

    जीवनात गुरु होण्याचा प्रयत्न न करता उत्तम शिष्य होऊन रहा असा सल्ला आपल्याला वडिलांनी दिला होता व तो आपण पाळत आहोत असे सांगून आज अनेक उत्तमोत्तम संगीतकार असून आपण केवळ त्यापैकी एक असल्याचे विनम्र उद्गार झाकीर हुसेन यांनी यावेळी काढले.

    मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या विशेष दीक्षांत सोहळ्यात उद्योगपती शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही पदवी देण्यात आली तर रसायन शास्त्रातील योगदाबाबद्दल वैज्ञानिक डॉ मुकुंद चोरघडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कन्या मोनिका गरवारे यांनी पदवीचा स्वीकार केला.

    कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्रकुलगुरु रवींद्र कुलकर्णी, संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे तसेच विविध कलाकार व विद्यापीठाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.