कणकवलीत वैभव नाईक यांची भेट ही विकास कामांसाठी – बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि संघटनात्मक सगळ्या विषयांमध्ये मी कोकण म्हणून प्रत्येक विषयामध्ये संघटनावाढीसाठी नेहमी प्रयत्न करत असतो.

    भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो. यामुळे कोणताही लोकप्रतिनीधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. नारायण राणे यांना विचारल्याशिवाय मी निर्णय करत नाही, असच मी प्रत्येकाला सांगत असतो. कणकवलीत वैभव नाईक यांची भेट ही विकास कामांसाठी होती, अशी प्रतिक्रिया बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी दिली.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीचा सर्व कामांच्या आढाव्या संदर्भातील एक बैठक घेण्यासाठी आलो होतो. खरतर रेल्वेने प्रवास करत कोकणकन्या थोडीशी उशिरा आल्यामुळे कणकवली रेस्ट हाऊसला मी सकाळच्या सगळ्या विधी आटपण्याच्या दृष्टीकोनातून जाऊन अंघोळ वैगरे करुन त्याठिकाणी तयारीच करत होतो. त्याठिकाणी माझे अनेक कार्यकर्ते व सर्वजण होते. परंतु त्याठिकाणी सिंधुदुर्ग आणि या भागातील आ. वैभव नाईक हे त्याठिकाणी आले. त्यांची आणि माझी त्याठिकाणी भेट झाली. खरतर माध्यमांमध्ये उलटसुलट अनेक गोष्टी सुरु आहेत. परंतु आपल्याला सर्वांना माहित आहे की, संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि संघटनात्मक सगळ्या विषयांमध्ये मी कोकण म्हणून प्रत्येक विषयामध्ये संघटनावाढीसाठी नेहमी प्रयत्न करत असतो.

    अनेक लोकप्रतिनीधी हे माझ्या संपर्कात असतात आणि सगळ्या विषयांमध्ये खऱ्या अर्थाने आ. वैभव नाईक यांनी सुध्दा बऱ्याचवेळा याविषयावर चर्चा केली. परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की, कोकण या विषयामध्ये ना. नारायण राणे यांना विचारल्याशिवाय यासंदर्भातला कोणताही निर्णय हा मी करु शकणार नाही, असे ना. चव्हाण हे म्हटले आहेत. वैभव नाईक यांच्या सोबत बऱ्याच गप्पा करण्यात आल्या आणि बंद दरवाज्यात काय घडल? हे जर सांगितल नाही तर हे उचित ठरणार नव्हत म्हणून सर्वांना या सगळ्याबद्दल माहिती असावी म्हणून सांगण्याचा थोडासा हा प्रयत्न करतो, असेही ना.चव्हाण यांनी सांगितले.