वैतागून शेतकऱ्यांन दिला तीन एकर ऊस पेटवून; लातुरातल्या शेतकऱ्यांची सहनशिलतेची मर्यादा संपली

चालू वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. लातूर तालुक्यातील साई गावाच्या शेतकऱ्यांन ऊस कारखान्याला जातं नाही, म्हणून वैतागून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. हाणमंत किसन पवार असं शेतकऱ्यांच नाव आहे.

    लातूर : चालू वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. लातूर तालुक्यातील साई गावाच्या शेतकऱ्यांन ऊस कारखान्याला जातं नाही, म्हणून वैतागून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. हाणमंत किसन पवार असं शेतकऱ्यांच नाव आहे.

    अतिरिक्त उसाच्या समस्येने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता दोन चार दिवसात पावसाळा सुरु होत असताना अद्यापही लातूर जिल्ह्यात किमान हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक आहे. साई गावाचे हाणमंत किसन पवार या शेतकऱ्यांन तीन एकर ऊसाची लागवड केली पण हंगाम संपत आला तरी ऊस साखर कारखान्याला जातं नसल्याने अक्षरशः पेटवून दिलाय.

    दरम्यान तळहातांच्या फोडाप्रमाणे सांभाळालेल्या उसाला स्वतः च्या हाताने हतबल होऊन पेटवून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आलीय ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी बाब आहे