वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’ आघाडीपासून ‘वंचित’; प्रकाश आंबेडकरांचा कॉंग्रेसकडे रोख, सांगितले स्पष्ट कारण, पाहा सविस्तर रिपोर्ट

    मुंबई : देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची महत्त्वाची आणि तिसरी बैठक उद्या मुंबईतील ग्रॅंड हयात या हॉटेल येथे पार पडणार आहे. यामध्ये देशभरातील सहा राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षसुद्धा या प्रमुख बैठकील उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी हे तीन प्रमुख पक्ष या सभेला उपस्थित राहणार आहेत. अशा वेळी वंचित बहुजन आघाडीसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडी का उपस्थित नाही, याचे कारण आपण जाणून घेऊया.

    वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर

    वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपण आघाडीला का उपस्थित नाही याचे कारण स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसवर रोख धरला. कॉंग्रेस आम्हाला निमंत्रण देत नाही. आमची आणि शिवसेनेची युती आहे. परंतु, आम्हाला कॉंग्रेस बैठकीटे निमंत्रण देत नाही, त्यामुळे आम्ही या आघाडीच्या बैठकीला जात नाही. त्याचबरोबर आमची युती महाविकास आघाडीसोबत नाही, आम्ही शिवसेनेतसोबतच युती केली आहे. त्यामुळे आम्ही आघाडीच्या बैठकीला जाऊ शकत नाही.

    बैठकीसाठी सहा विद्यमान मुख्यमंत्री येणार
    शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, भारतीय गटाच्या तिसऱ्या बैठकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या बैठकीला सहा विद्यमान मुख्यमंत्री येणार आहेत. बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे,” असे त्यांनी सांगितले.
    इंडिया आघाडीची बैठक महाराष्ट्रात
    दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भारतीय आघाडीची बैठक महाराष्ट्रात होणार आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. बंगळुरूमध्ये आम्ही २६ (पक्ष) होतो, इथे २८ (पक्ष) झाले आहेत. जयसे भारत बढेगा, वैसे हाय चीन पीचे हाथेगा (जेव्हा भारत पुढे जाईल, चीन मागे हटेल.
    शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील तमाम देशप्रेमी इंडिया आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत. सर्व देशप्रेमी इथे आहेत. आम्ही भारतमातेला वाचवण्यासाठी इथे आहोत. आम्ही हुकूमशाही सरकार आणि राजकीय नौटंकींच्या विरोधात आहोत. ज्या पद्धतीने भारताचा गट पुढे जाईल, त्याचप्रमाणे केंद्र मोफत गॅस सिलिंडर देण्यास सुरुवात करेल. केंद्र स्वतः गॅसवर चालत आहे. आपल्या राज्यघटनेला जुलमी शक्तींपासून वाचवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.