इमारतीमधील वाहनांची तोडफोड; कोयत्याने माजवली दहशत

दारूच्या नशेत टोळक्याने इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

    पुणे : दारूच्या नशेत टोळक्याने इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. परशुराम उर्फ प्रशांत ओम पवार (वय २६), अनिकेत राजेंद्र भिसे (वय २० रा. वैदवाडी, हडपसर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात सुरज शेंडगे (वय २१ रा. वैदवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे तीन साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

    परशुराम आणि ओम यांच्यासह इतर साथीदार महाराष्ट्र क्रांती अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांनी मध्यरात्री दारूच्या नशेत हातात कोयते व लोखंडी रॉड घेऊन येथे लावलेल्या रिक्षा, कार व दुचाकींची तोडफोड केली. इमारतीमधील नागरिकांना शिवीगाळ करून त्यांना पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.