Mokka' on gangs snatching jewels from women's necks; 116th Action of Police Commissioner Ritesh Kumar
Mokka' on gangs snatching jewels from women's necks; 116th Action of Police Commissioner Ritesh Kumar

  पुणे : आम्ही वडगाव शेरीचे भाई आहोत म्हणत रोडवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या अतिश डिंगरे व त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत १०६ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे.

  कारवाई करण्यात आलेले आरोपी

  टोळी प्रमुख अतिश उमेश डिंगरे (वय २३ रा. दिपक चौपाटी, ता. वणी, यवतमाळ), स्वप्नील गोवर्धन ओव्हाळ (वय २२), कुणाल महेंद्र परीहार (वय २० रा. वडगाव शेरी), आकाश हरीश्चंद्र पायगुडे (वय २२ रा. लोहगाव), अजय राम घनघाव (वय २३ रा. धानोरी, विश्रांतवाडी), आदित्य संदेश कांबळे (वय २१ रा. वडगाव शेरी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

  चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  गेल्या महिन्यात (दि. २३ नोव्हेंबर) मध्यरात्री सत्यम सेरेनिटी सोसायटी माळवाडी तसेच वडगाव शेरी गावठाण परिसरात या टोळक्याने राडा घालत तोडफोड केली होती. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी संघटित गुन्हेगारी करत असल्याचे समोर आले होते.

  महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई

  त्यानुसार, टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला होता. अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशाने मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.