संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी सुरू करण्यात येणार : सुधीर मुनगंटीवार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर (मृगया चिन्ह केंद्र), वन्यजीव रुग्णालय आणि कॅट ओरीएंटेशन सेंटर (मार्जार वंशाची सर्व माहिती देणारे केंद्र), आदी बांधकामांचा लोकार्पण सोहळा आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता.

    मुंबई : काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) सर्वांनाच मोहित करणारी वनराणी ट्रेन (Vanrani Train) कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrut Mahotsav) साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर (Taxidermy Center), वन्यजीव रुग्णालय आणि कॅट ओरीएंटेशन सेंटर (मार्जार वंशाची सर्व माहिती देणारे केंद्र), आदी बांधकामांचा लोकार्पण सोहळा आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता.

    मुनगंटीवार म्हणाले की, उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येकाला अशा ट्रेनचे आकर्षण असते. ही ट्रेन सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत असल्याने या उद्यानात ट्रेन आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.

    टी फॉर टंडन, टायगर आणि ट्री
    अभिनेत्री रविना टंडन (Ravina Tondon) या राज्य शासनाच्या वन्यजीव सदिच्छादूत म्हणून काम करणार असून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांची मदत होणार आहे. जसे रविना टंडन यांना त्यांच्या सशक्त अभिनयासाठी महाराष्ट्रात ओळखले जाते; तसेच महाराष्ट्र हा वाघ आणि वृक्ष लागवडसाठी सुद्धा ओळखला जातो. मी गेल्या वेळी वनमंत्री असताना राज्यातील वाघांची संख्या १९० वरून ३१२ करण्यासाठी आणि ५० कोटी वृक्ष लागवड हे प्रकल्प राबविल्याने याची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.