५० रुपयांच डायलेसिस,ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टकडून दिवाळी भेट

विरारच्या पश्चिमेकडील संजीवनी हॉस्पिटल शेजारी दत्तमंदिराच्या वर स्व.तारामती आणि हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रष्ट संचलित डायलेसिसचे रुग्णालय सुरु आहे.

    वसई-विरार : बाराशे ते सोळाशे रुपयांना मिळणारा डायलेसिसचा उपचार आता फक्त ५० रुपयांत उपलब्ध करुन विरारच्या ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टने वसईकरांना दिवाळीची आगळी-वेगळी भेट दिली आहे. या योजनेचे उद्घाटन धनतेरेसला एका रुग्णाच्या हस्ते करण्यात आले.

    विरारच्या पश्चिमेकडील संजीवनी हॉस्पिटल शेजारी दत्तमंदिराच्या वर स्व.तारामती आणि हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रष्ट संचलित डायलेसिसचे रुग्णालय सुरु आहे. गोरगरीबांना हे उपचार करण्यासाठी प्रत्येकवेळी बाराशे ते सोळाशे रुपये खर्चावे लागतात. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाचे आर्थीरक गणीत कोलमडून पडते. ही बाब लक्षात घेऊन ठाकूर टॅस्टने फक्त ५० रुपयांत तज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने डायलेसिस करण्याचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला धनतेरेसच्या दिवशी सुरुवात झाली. आमदार हितेंद्र ठाकुर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, माजी महापौर राजीव पाटील, माजी सभापती अजीव पाटील, प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर, पंकज ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

    या सेंटरमध्ये २३ डायलेसिस मशीन उपलब्ध असून, दररोज ७० रुग्णांना त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यांना फक्त ४०० रुपयात (डायलेझर, ट्युबिंग, आय व्ही सेट, इंजेक्शन, डॉक्टर फी आणि नास्ता) डायलेसिस करता येणार आहे. या ४०० रुपयांपैकी ३५० रुपये वसई विरार महापालिकेकडून देण्यात येणार आहेत. उर्वरीत फक्त ५० रुपये रुग्णाला भरावे लागणार आहेत. कामावर जाणाऱ्या लोकांना दांडी न मारता डायलेसिस करता यावे यासाठी रात्रपाळीतही हे केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती व्यवस्थापक तुकाराम पष्टे यांनी यावेळी दिली.