लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेला आणखी एका तरुणीचा बळी, मेकअप आर्टीस्ट प्रेयसीचा खून करुन प्रेत फेकले वापीला

पोलिसांनी आरोपी मनोहर याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

    नायगांव : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या मेकअप आर्टीस्ट प्रेयसीचा खून करुन तिचे प्रेत सुटकेसमध्ये कोंबून वापी शहरात फेकण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. फिल्म इंडस्ट्रीत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम कराणा-या नैनाचे तिच्यासोबत काम करणा-या कॉस्ट्युम डिझायनर मनोहर शुक्लासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही नायगांव परिसरात रहात होते. मात्र मनोहर विवाहित असल्याने नैनावरून मनोहर आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होतं होती. तर दुसरीकडे नैना लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे आपला संसार टिकवण्यासाठी मनोहरने प्रेमाचा बळी दिला.

    त्याने नेनाची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुटकेसमध्ये मृतदेह कोंबला आणि वापी परिसरात फेकला. तिचे प्रेत मिळाल्यानंतर ही घटना उघड झाली. नेना आणि मनोहर या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मनोहरने आपल्याशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती. पण आधीच लग्न झाल्याने मनोहर यासाठी तयार नव्हता. पण तिने लग्न करण्यासाठी तगादा लावल्यामुळे हत्या केल्याचा आरोप मयत नैनाच्या बहिणीने केला आहे. पोलिसांनी आरोपी मनोहर याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.