नायगांव झोपडपट्टीतून अटक, मोबाईल चोरट्याकडून ८ गुन्हयांची उकल, गुन्हे शाखा कक्ष – २ ची यशस्वी कामगिरी

गुप्त बातमीदाराकडील व मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून जाकिर अली मेहबुब अली शेख उर्फ कालीया याला नायगांव झोपडपट्टीतून अटक करण्यात आली.

    वसई : मोबाईल चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ ला यश आले आहे. वालीव पोलीस ठाणे हद्दीतील गोविंद पवार यांच्या घरी चोरी करण्यात आली होती. अशा घरफोडीच्या आणि मोबाईल चोरीच्या अनेक घटना या परिसरात घडल्या होत्या. त्या अनुषंगाने घडणा-या प्रत्येक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचे ठिकाण गुन्हे शाखेने भेट देऊन चोरीस गेलेल्या मोबाईल सायबर सेल मार्फत पाळत ठेवली होती. तसेच गुप्त बातमीदाराकडील व मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून जाकिर अली मेहबुब अली शेख उर्फ कालीया याला नायगांव झोपडपट्टीतून अटक करण्यात आली.

    त्याची कसून चौकशी केल्यावर वरील चोरीसह वालीव पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील घरफोडीचे ४ आणि मोबाईल चोरीचे ४ असे ८ गुन्हे कबुल केले. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, म.सु.ब.अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली.