वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, दोघांत काय चर्चा झाली?

आज वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, या भेटीनंतर दोघांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकला आहे. मनसेत असतानाही त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता. मोरे यांची पाऊले आता वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने पडताना दिसत आहेत. आज वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, या भेटीनंतर दोघांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  वसंत मोरे काय म्हणाले?

  प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक सकारात्मक झाली. येत्या दोन तीन दिवसात निर्णय होईल, तो निर्णय सर्वांना कळवला जाईल.

  प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

  तात्यांसोबत चर्चा झाली. दुसरी महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. जे काही अधिकृत सांगायचं आहे, ते 31 तारखेपर्यंत कळवेन. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि कोण कोण करेल हे अधिकृतपणे 31 किंवा 1 तारखेपर्यंत सांगितलं जाईल. काही चर्चा ओपन करु शकत नाही. कारण सध्या घडामोडी घडत आहेत.

  राजकीय स्तरावर नाहीत पण सोशल पातळीवर, गावपातळीवर सुरु आहेत. त्या चर्चांना एक रुप येण्यासाठी दोन तीन दिवस जातील. त्यानंतर महाराष्ट्राचं नवं समीकरण समोर येईल. आजची चर्चा त्याअनुषंगाने झाली. ग्रामीण आणि शहरी पातळीवर जे काही घडतंय ते दोन-चार दिवसात समोर येईल. सर्वांची उत्तरं मिळतील. मविआकडून आवाहन केलं जातंय, पण जे काही होतंय त्याबाबत दोन तारखेपर्यंत थांबा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.