वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे राज ठाकरेंची भेट घेणार, वंसत मोरे म्हणाले…

काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राजीमाना दिला. त्यांनी मनसेला दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.

    काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राजीमाना दिला. त्यांनी मनसेला दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. पक्षाचा राजीमाना दिल्यानंतर काही काळ वसंत मोरे अस्वस्थ होते. त्यांनी राज ठाकरे यांचा फोन घेणं देखील टाळलं. मात्र या संदर्भात वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना वंसत मोरे म्हणाले, पक्षातील एका नेत्याकडे राज साहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केली होती, की कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेब ठाकरे यांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचं नाही. मला त्यांच्याशी बोलायला जमणार नाही, असे वंसत मोरे म्हणाले. मात्र आता वसंत मोरे राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    का घेणार राज ठाकरे यांची भेट

    वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढणार आहेत. त्यांना या निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेते रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता पुणे लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. म्हणून आता वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मी राज ठाकरे यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार, असे वसंत मोरे म्हणाले.

    राज ठाकरे आमच्या नाराज असतील

    मागील अनेक वर्षांपासून वसंत मोरे यांची नळ मनसे सोबत जोडलेली होती. मात्र अचानक वंसत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मनसेमधून बाहेर पडल्यानंतर साहेब नाराज आहेत, मात्र बघू आता काय करतात. आमचे मतभेद झाले पण मनभेद झाले नाही. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो. काय होते हे घोडे मैदानावर आल्यानंतर बघू, असे वंसत मोरे म्हणाले.