
आज वटपौर्णिमा वट सावित्रीचे व्रत आहे. या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात सण,व्रत वैकल्यांना फार महत्त्व आहे. जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमचं एक वेगळंच महत्त्व आहे. मुंबईत आज ठिकठिकाणी वटपोर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण साजरा केला.
आज वटपौर्णिमा वट सावित्रीचे व्रत आहे. या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार, सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला.
या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, हा त्यामागचा हेतू आहे.
वटपौर्णिमेच्या वाणात आंब्यासह फणसाच्या गराला महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी वटपौर्णिमेच्या काही दिवस आधीच मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, चेंबूर, विलेपार्ले, अंधेरी, खार, बोरिवली, कांदिवली, दादर आदी भागांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा शहरात विक्रीसाठी फणस मोठ्या प्रमाणात नेण्यात आले आहेत. कोकणातील अनेक तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात वाहनातून फणस भरून नेला जात आहे.