Vatvriksha Pujan of women police in Wardha

वटपौर्णिमा सती सवित्रीच्या पती प्रेमाची प्रशंसा करणारे पूजन. लग्नात बांधलेली लगीनगाठ आणखी घट्ट करण्यासाठी भगिनींनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत धाग्यांनी आणखी रेशीमबंध घट्ट करण्याचाच दिवस. झाडाचे पूजन म्हणजेच पर्यावरणाचे देखील पूजन. पण कोरोनाच्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांसमोर कर्तव्य आणि कुटुंबप्रेम असे दोन्ही कर्तव्य पार पडण्याचाच प्रश्न उभा ठाकला. अखेर पोलीस ठाण्यातच आवारात उभ्या असलेल्या डौलदार वटवृक्षाला फेऱ्या मारून खाकीतल्या सवित्रीणी आपल्या कौटुंबीक कर्तव्याची जबाबदारी देखील पार पाडली(Vatvriksha Pujan of women police in Wardha).

    वर्धा : वटपौर्णिमा सती सवित्रीच्या पती प्रेमाची प्रशंसा करणारे पूजन. लग्नात बांधलेली लगीनगाठ आणखी घट्ट करण्यासाठी भगिनींनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत धाग्यांनी आणखी रेशीमबंध घट्ट करण्याचाच दिवस. झाडाचे पूजन म्हणजेच पर्यावरणाचे देखील पूजन. पण कोरोनाच्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांसमोर कर्तव्य आणि कुटुंबप्रेम असे दोन्ही कर्तव्य पार पडण्याचाच प्रश्न उभा ठाकला. अखेर पोलीस ठाण्यातच आवारात उभ्या असलेल्या डौलदार वटवृक्षाला फेऱ्या मारून खाकीतल्या सवित्रीणी आपल्या कौटुंबीक कर्तव्याची जबाबदारी देखील पार पाडली(Vatvriksha Pujan of women police in Wardha).

    वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पतीव्रता धर्माचे पालन वर्धा शहर पोलीस ठाण्यातील आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी निभावले. वर्धा शहर ठाण्यातील वडाच्या झाडाचे पूजन करून केले.

    शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी यांनी ठाण्याच्या आवारातील वटवृक्षाचे पूजन केले. कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज रुढीपरंपरेनुसार भारतीय नारी म्हणून वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकी वर्दीत वटपौर्णिमा साजरी करताना आम्हाला एकप्रकारे गर्वच वाटत आहे, असे महिला पोलीस कर्मचारी यांनी सांगितले.