वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये अद्यापी जागा शोधत आहेत ; रोहित पवार यांची टीका

मोठा रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन उद्योग गुजरात मधे जाणार असल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले असून उद्योगा बाबत येणाऱ्या घडामोडींवर सरकारवर तोंडसुख घेण्याची संधी विरोधीपक्ष सोडत नसल्याचे दिसत आहे.

    अहमदनगर: मोठा रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn Plant)उद्योग गुजरात मधे जाणार असल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government)सरकारला चांगलेच धारेवर धरले असून उद्योगा बाबत येणाऱ्या घडामोडींवर सरकारवर तोंडसुख घेण्याची संधी विरोधीपक्ष सोडत नसल्याचे दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) आतापर्यंत अनेकदा सरकारवर टीका केली आहे. वेदांता-फॉक्सकॉन उद्योग गुजरातला जात असला तरी त्यासाठी लागणाऱ्या जागेचा शोध अद्याप सुरू असल्याचे सांगत आमदार रोहित यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    काय आहे ट्विट?
    “वेदांता-फॉक्सकॉन’ने महाराष्ट्रात जागा निश्चिती केली असतानाही राजकीय उदासिनतेमुळे गुजरातमध्ये गेलेला हा उद्योग अजूनही तिकडं जागेचा शोध घेतोय, हे म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही त्याकडं दुर्लक्ष करुन दुसरीकडं जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा जमा करण्यासारखा प्रकार आहे”., अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आज(सोमवारी) एक ट्विट करत त्यांनी हे टीकास्त्र शिंदे-फडणवीस सरकारवर सोडत केंद्र सरकरवरही निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये आ.पवार पुढे म्हणतात की, वेदांता-फॉक्सकॉनवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळं डबल इंजिनचा प्रचार करणाऱ्या राज्य सरकारने हा उद्योग महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडं आग्रह धरावा, ही विनंती!, असे त्यांनी म्हटले आहे.