वेदांता प्रकल्प जाणे हे पाप शिंदे-फडणवीस सरकारचे, जयंत पाटील यांचा राज्य सरकारवर घणाघात

हे पाप शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde fadnvis government) आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी नांदेड (nanded) येथे केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  काल (सोमवारी) परभणी जिल्हा केल्यानंतर आज हिंगोली आणि नांदेड जिल्हयाची आढावा बैठक घेतली.

    नांदेड : वेदांता प्रकल्प (Vedanta project) इतर राज्यात गेल्याने अनेक तरुणांना नोकरीला मुकावे लागले आहे. हे पाप शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde fadnvis government) आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी नांदेड (nanded) येथे केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  काल (सोमवारी) परभणी जिल्हा केल्यानंतर आज हिंगोली आणि नांदेड जिल्हयाची आढावा बैठक घेतली. आघाडी सरकारबद्दल जे राजकारण शिंदे-फडणवीस सरकारने केले ते सर्वसामान्य जनतेला पटलेले नाही. त्यांच्या विषयी जनतेत रोष आहे, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

    दरम्यान, महाराष्ट्रात जे सत्तेत आहेत ते असमाधानी आहेत. त्यांचे त्यांना माहिती नाही की आपण कधीही अपात्र ठरू. जे लोक पक्षांतर करून जातात त्यांच्यापेक्षा  सामान्य सैन्य महत्त्वाचे आहे. त्यांचे बळकटीकरण झाले पाहिजे असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण मोठ्या संख्येने सभासद नोंदणी केली तर भविष्यात नांदेड जिल्ह्याला विशेष ताकद दिली जाईल. पक्षातंर्गत निवडणुकीत स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन सर्वमान्य अध्यक्ष निवडले  जातील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.