वेदांत नांगरे ‘आयर्नमॅन’ किताबाचा मानकरी

नुकत्याच पार पडलेल्या थुन स्वित्झर्लंड येथील आयर्नमॅन स्पर्धेत आगाशिवनगर (ता.कराड) येथील वेदांत अभय नांगरे याने या स्पर्धेतील आयर्नमॅनचा किताब मिळवला. 

    कराड : नुकत्याच पार पडलेल्या थुन स्वित्झर्लंड येथील आयर्नमॅन स्पर्धेत आगाशिवनगर (ता.कराड) येथील वेदांत अभय नांगरे याने या स्पर्धेतील आयर्नमॅनचा किताब मिळवला. मुळचा मारुल हवेली (ता.पाटण) येथील वेदांतने ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. या स्पर्धेसाठी जगभरातील पंधराशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ३.९ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकल चालवणे व ४२.२ किलोमीटर धावणे असे मिळून हे अंतर १६ तासाच्या आत स्पर्धकाला पूर्ण करायचे असते. वेदांतने हे सर्व अंतर १४ तास २७ मिनिटात पूर्ण केले.

    थुन स्विझर्लंड येथील ही स्पर्धा जगातील आयर्नमॅन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यासाठी वेदांत तीन वर्षे अगोदर पासून तयारी करत होता. कोविडमुळे ही स्पर्धा होत नव्हती. तसेच व्हिसा मिळण्यासाठी सुद्धा अडचणी येत होत्या. तरीही त्याने सातत्य ठेवून नियमित सराव केला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत असताना यश मिळताच स्वित्झर्लंड मध्ये भारताचा झेंडा त्याने अभिमानाने फडकवला आहे.

    - खा. श्रीनिवास पाटील, सातारा

    या खेळात तीन वेगवेगळे क्रीडा प्रकार असल्याने तयारी करताना विविधता राहते. अशा क्रिडा प्रकाराकडे अधिक युवक, युवतींनी वळले पाहिजे.

    - वेदांत नांगरे, आयर्नमॅनचा किताब विजेता