
वसई : वसईच्या (VASAI) पुर्वेकडील फणसपाड्यातील चोरी गेलेली दुचाकी शोधताना गुन्हे शाखेने एका त्रिकुटाला अटक केले असून,त्यांच्याकडून १२ गुन्ह्यांची उकल केली आहे,वालीव पोलीस ठाणे हद्दीतील फणसपाडा येथील अॅक्टीवा (ACTIVA) घरासमोरुन चोरीस गेली होती. या चोरीचा सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करुन गुन्हे शाखेने वसई कोळीवाडा येथून शमशुददीन अब्दुल रज्जाक, फिरोज अब्दुल रज्जाक शेख आणि मुस्ताक मुन्ना शेख ऊर्फ शोयब टरकीला डांगेवाडी, अकबर राईस मिल जवळून ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून चोरी केलेल्या ८ मोटार सायकल व ४ ऑटो रिक्षा असे एकुण ५ लाख २६ हजार किंमतीची १२ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.तसेच त्यांच्याकडून आयुक्तालयातील १० आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १ व मुंबई पोलीस आयुक्तालयातील १ असे १२ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. ही कामगीरी वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन सानप,हवालदार मुकेश पवार,मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.