हडपसरमधून वाहन चोरणाऱ्याला पकडले; दोन दुचाकींसह रिक्षा जप्त

हडपसर भागातून रिक्षा तसेच दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदार मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आला आहे.

    पुणे : हडपसर भागातून रिक्षा तसेच दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदार मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आला आहे.

    दिलीप शिवराज म्हेत्रे (वय २४, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसर भागात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी म्हेत्रे व अल्पवयीन साथीदाराने दुचाकी चोरल्याची महिती मिळाली. त्यानूसार, पोलिसांच्या पथकाने सापळा लावून म्हेत्रे आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाला पकडले.

    चौकशीत त्यांनी हडपसर भागातून दोन दुचाकी आणि एक रिक्षा चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे व त्यांच्या पकाने केली.