हिंदू संस्कृतीवर अनेक दिवसांपासून अत्याचार सूरू ; विहिंपचे केंद्रीय मंत्री मिलिंद परांडे यांचे मत

  यवत : हिंदू समाजावर अनेक दिवसापासून अन्याय अत्याचार होत आहे. या अत्याचाराच्या विरोधात कीर्तनकार व प्रवचनकारांनी धर्माच्या रक्षणासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले.

  पाटेठाण (ता दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने दोन लाखाव्या साखर पोत्याचे पूजन, कीर्तनकार,प्रवचनकार यांचा सन्मान सोहळा तसेच कोविड काळात मृत्युमुखी पडलेला सभासदांना आर्थिक मदतीचे वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

  यावेळी बोलताना परांडे म्हणाले,देशामध्ये हिंदू विरोधी कट कारस्थानामुळे एकीकडे होय आम्ही राक्षस आहोत!, या धर्मविरोधी प्रवृत्तीेचे समर्थन होत आहे.हे धोकादायक असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. लव जिहाद हे सुद्धा गंभीर आक्रमण असून पालकांनी आपल्या मुलींना योग्य शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुरेश महाराज साठे होते. याप्रसंगी श्रीनाथ कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत,संचालक किसन शिंदे,भिमाजी मेमाणे,मुख्याधिकारी डी.एम रासकर,शिवले महाराज,संजय थोरात,विकास शितोळे,सतिश टिळेकर, चंद्रकांत धायगुडे, बापू गाढवे,बापू टेंगले, इंद्रजीत नवले,दिगंबर जाधव,चंद्रकांत धायगुडे, वरपे महाराज आदिम सहित सभासद व कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रस्ताविक कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी केले. सूत्रसंचालन एस. टिळेकर यांनी तर आभार कारखान्याचे संचालक किसन शिंदे यांनी मानले.

  समाज प्रबधनाचे कार्य करत असणाऱ्या सर्व प्रवचन व कीर्तनकारांना टोल माफी होणे गरजेचे आहे.

  सुरेश महाराज साठे (अध्यक्ष संतराज देवस्थान ट्रस्ट)