वर्धेत पुन्हा आढळले ५७ कोरोनाबाधित

  • एकाचा मृत्यू, ३५ कोरोनामुक्त

 वर्धा.   जिल्हयात आतापर्यतचे एक दिवसांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मंगळवारची सायंकाळपर्यंतची आकडेवारी ५७ इतकी आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यात वर्धा तालुक्यातील २१, कारंजा ५, देवळीतील ९, हिंगणघाट १०, सेलू ५, समुद्रपूर २, आर्वी ३ आणि आष्टीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

बॅंक ऑफ बडोदा सील
वर्धेत बँक ऑफ बडोदाचा शिपाई कोरोनाबाधित आढळून आल्याने बँकेला सील करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. प्राप्त २११ अहवालापैकी ५७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अहवाल निगेटीव्ह आलेल्या १९० जणांना आयसोलेशनमधून मुक्त करण्यात आले आहे.

आयसोलेशनमध्ये ४५५ जण दाखल
प्रशासनाने मंगळवारी नव्याने ४५५ जणांना आयसोलेशनमध्ये दाखल करून घेतले आले. यापैकी २३६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. एकूण २०४ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७२२ झाली आहे. मंगळवारी ३५ जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यत एकूण ४६७ जण कोरोनामुक्त तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४८ आहे.