वर्ध्यात पुन्हा आढळले ८ पॉझिटीव्ह

शुक्रवारी जिल्ह्यातील २५३ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ८ जण पॉझिटीव्ह आढळून आले. २३७ जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आयसोलेशन मधून मुक्त करण्यात आले. नव्याने ३२९ जणांना दाखल करण्यात आले.

९ रूग्ण झाले कोरोनामुक्त

वर्धा : शुक्रवारी  जिल्ह्यातील २५३ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी  ८ जण पॉझिटीव्ह आढळून आले. २३७ जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आयसोलेशन मधून मुक्त करण्यात आले. नव्याने ३२९  जणांना दाखल करण्यात आले. 

 शु्क्रवारी २७० जणांचे स्वॅब पाठविण्यात आले. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये  सेवाग्राम येथील ३० वर्षीय पुरुष, देवळी तालुक्याच्या  झाडगांव येथील ६२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, १८ वर्षीय पुरूष, सेलू वार्ड नं.७ येथील ५० वर्षीय महिला व  वर्धेच्या  हनुमान वार्डातील ४७ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, डॉ. झाकीर हुसैन  कॉलनी येथील २२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यत  जिल्ह्यातून ९ हजार ९५४ जणांचे  स्वॅब पाठविण्यात आले. यातील  ९  हजार ३४७ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर,  २९२ जणांचा  अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा २७० वर गेला आहे. शुक्रवारी ९ जण तर आतापर्यत  एकूण २२७  रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. ९ जणांचा मृत्यू झाला आहे.  सध्या ३४ अॅक्टीव्ह रूग्ण आहे. आतापर्यत ७० हजार ६१२ जणांना  क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ६६ हजार ३७५  जणांचा कालावधी समाप्त झाला आहे. सध्या ५२३७ जण होम क्वारंटाईन तर ३१० जण इन्स्टीट्यूशन क्वारंटाईनमध्ये आहे.