धावत्या विदर्भ रेल्वेसमोर उडी घेऊन प्रेमी युगुलानं आयुष्याचा केला शेवट

मृत तरुण हा संग्रामपूर तालुक्यातील कवठलं येथील रहिवासी आहे. अजय संजय मोरखडे (वय 22 वर्ष) असं त्याचं नाव आहे. तर 14 वर्षीय मृत अल्पवयीन युवती ही त्याच परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    बुलडाणा : धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलान आपल्या आयुष्याच शेवट केला. ही धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास बुलडाणा येथे उघडकीस आली.धावत्या विदर्भ एक्स्प्रेससमोर (Vidarbha Express) उडी घेऊन एका अल्पवयीन मुलीसह तरुणानं आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon)रेल्वे स्थानकाजवळ शेगाव ते नागझरी दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. मृत तरुण हा संग्रामपूर तालुक्यातील कवठलं येथील रहिवासी आहे. अजय संजय मोरखडे (वय 22 वर्ष) असं त्याचं नाव आहे. तर 14 वर्षीय मृत अल्पवयीन युवती ही त्याच परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गोंदिया-मुंबई सुपरफास्ट विदर्भ एक्स्प्रेस शेगावकडे येत होती. यावेळीनागझरी ते शेगाव दरम्यान व शेगाव रेल्वे स्थानकापासून जवळ नागरिकांना दोघांचे छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे मार्गावर आढळून आले. त्यानंतर परिसरात एकच खळब उडाली होती. या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, रात्र असल्यानं दोघांची ओळख पटली नाही. मात्र या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.