बुलढाण्यातील केमिकल कंपनीला हरित लवादाचा ठोठावला 250 कोटींचा दंड!

बुलढाण्यातील केमिकल कंपनीला हरित लवादाचा झटका दिला आहे. प्रदूषण पसरविल्याचा ठपका ठेवत 250 कोटींचा दंड ठोठावला आहे.

    बुलडाणा : बुलढाण्यातील एका केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादानं झटका दिला आहे. कंपनीमुळे सातत्यान प्रदुषण होत असल्याचा ठपका ठेवत 25 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीन रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने 50 शेतकऱ्यांची 250 एकर जमीन नापीक झाल्याची माहिती समोर आली आहे.

    बुलढाण्यातील मलकापूर येथे दसरखेड एमआयडीसीमध्ये बेंझो केमिकल्स नावाने कंपनी आहे. या कंपनी केमीकल तयार करण्यात येतात. मात्र, कंपनी व्यवस्थापनेनं कंपनीतून निघणाख्या सांडपाण्याची नीट व्यवस्था केली नाही. हे पाणी जवळच्या परिसरात सोडण्यात येतं होतं. त्यामुळे परिसरातली शेत जमिनीसह परिसरातील पाण्याच्या स्रोतांचे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली होती.
    या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडे कारवाई करत पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 250 कोटी रुपये दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिला आहे. दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही लवादाने दिला आहे.