Accused sent to jail by Akot Sessions Court in recovery of overdue electricity bill

महावितरणचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी काटोले याने अडथळा निर्माण केला. त्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे आरोपीची १५ मार्च रोजी अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली.

    अकोट : थकीत वीज बिल वसुलीच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपीची आज कारागृहात रवानगी केली. विद्युत महावितरण कंपनी, अकोट शहर विभाग येथील कर्मचारी व या प्रकरणातील फिर्यादी योगेश पांडुरंग दिघे हा इतर कर्मचा-यांसोबत २० मार्च २०१८ रोजी वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याकरिता गेला असता, आरोपी निलेश प्रमोद काटोले याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबतची तक्रार अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

     या प्रकरणात अकोट सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. या खटल्यामध्ये आरोपीविरुद्ध भा.दं.वि.चे कलम ३५३ नुसार, महावितरणचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी काटोले याने अडथळा निर्माण केला. त्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे आरोपीची १५ मार्च रोजी अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात पुढील तारखेला शिक्षेसंबंधी आरोपीचे कथन तसेच आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद व सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांचा युक्तिवाद १७ मार्च रोजी झाल्यानंतर आरोपीला शिक्षेची घोषणा करण्यात येणार आहे.