
महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना बाबर यांना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
नवी दिल्ली : अकोला येथील श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी सपना सुरेश बाबर (Sapna Babar) यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज (शुक्रवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
#अकोला की श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालय की विद्यार्थी #सपनाबाबर
को उल्लेखनीय योगदान के लिये आज #राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी के हाथों #राष्ट्रीयसेवायोजना पुरस्कार प्रदान किए गये। केंद्रीय युवक कल्याण @ianuragthakur जी तथा राज्यमंत्री @NisithPramanik उपस्थित थे । pic.twitter.com/dLJMMeSczl— महाराष्ट्र सूचना केंद्र (@MahaMicHindi) September 24, 2021
यावेळी केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री निशीथ प्रमाणिक उपस्थित होते. महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना बाबर यांना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. आज त्यांना राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सपना बाबर यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट अभियान, तंबाखूमुक्त अभियान, सडक सुरक्षासंबंधी अनेक कार्यात लोकांना सक्रीय सहभागाविषयी मार्गदर्शन केले.
दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचे अकोल्यातील लोकशाही सभागृहात अभिनंदन करण्यात आले. अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.