अनिल बोंडेच्या अडचणीत वाढ, अमरावती हिंसाचार प्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार

दंगलीच्या आरोपीला एका दिवसात जमानत मिळतेच कशी? बाकीच्या आरोपींची दोन- दोन महिने जमानत होत नाही. नेमकं अमरावतीमधे काय झालं? कशा प्रकारे झालं? याची सर्व चौकशी करण्यात यावी.

    अकोला (Akola) : त्रिपुरा येथे झालेल्या घटनेचा निषेधदार्थ अमरावतीमध्ये (in Amravati) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हिंसक वळण (the violent turn of the protest) आल्याने त्याठिकाणी गेल्या सात दिवसापासून संचारबंदी लावण्यात आली आहे. पण यामध्ये माजी कृषिमंत्री (former agriculture minister) अनिल बोंडे (anil bonde) यांना अटक करण्यात आली. मात्र, दंगल घडवून आणणाऱ्या माजी मंत्र्यांना (former ministers) एका दिवसात जामिनही मिळाला. यानंतर आता माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

    दंगलीच्या आरोपीला एका दिवसात जमानत मिळतेच कशी? बाकीच्या आरोपींची दोन- दोन महिने जमानत होत नाही. नेमकं अमरावतीमधे काय झालं? कशा प्रकारे झालं? याची सर्व चौकशी करण्यात यावी. अनिल बोंडे यांची कसून चौकशी करून त्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे अशी तक्रार गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

    हे सर्व भाजपचे षड्यंत्र असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यांना टिकू द्यायचे नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. अनिल बोंडे यांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय महासचिव) जावेद जकरिया यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.