अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा; रंगत अटीतटीची होण्याची शक्यता

विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत तर दोन नंबरवर भाजपचे सदस्य आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ गत निवडणुकीमध्ये अधिक असूनही बाजोरियांनीच गड राखला होता.

    अकोला (Akola) : स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये (the local body elections) अखेर सराफा व्यावसायिक संस्थेच्या (Sarafa Business Association) भाजपकडून (BJP) वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याने आता महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. वसंत खंडेलवाल हे संघ परिवारातील (Sangh Parivar) असल्याने त्यांचेच नाव फायनल होईल, अशी चर्चा होती.

    गत निवडणुकीमध्ये खंडेलवाल हे भाजपचे ते दावेदार होते. मात्र, युतीमध्ये ती जागा शिवसेनेच्याच वाट्याला राहिल्याने खंडेलवाल यांना माघार घ्यावी लागली होती. शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपिकिशन बाजोरिया यांची उमेदवारी कायम असली तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेल नाही. असे असले तरी काँग्रेसचे स्थानिक नेते बाजोरिया हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर ठाम आहेत.

    वाशीम, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार या मतदानाचा निवडणुकीत अधिकार बजावणार असल्याने मतदार सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत तर दोन नंबरवर भाजपचे सदस्य आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ गत निवडणुकीमध्ये अधिक असूनही बाजोरियांनीच गड राखला होता.

    गेल्या काही दिवसांपासून बाजोरिया यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध भाजप घेत होती अखेर तोडीस तोड म्हणून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची म्हटल्यास वावगे राहणार नाही. पण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ कुणाला?

    कारण, वंचित बहुजन आघाडीचे सदस्य संख्या ही ६० च्यावर आहे. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक असतात. शेवटच्या दिवसापर्यंत वंचित आघाडीची मते कुणाला जाणार हे निश्चित नसते. पूर्व इतिहास पाहता शिवसेनेचे उमेदवार गोपिकिशन बाजोरिया यांच्या बाजूने वंचित आघाडीचा कल राहिला आहे. पण यावेळी वंचित आघाडीचे मतदान भाजपला जाते की महाविकास आघाडीला की त्यांचा स्वतंत्र उमेदवार ठरतो. हे मात्र गुलदस्त्यात आहे.