घरकुलाचा चेक देण्यासाठी मागितली ५ हजार रुपयांची लाच; एसीबीकडून तिघांना अटक

आर्थिक दुर्लभ आणि मागासवर्गीय समाजातील (economically deprived and backward communities) नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून सरकारने विविध घरकुल योजना (housing schemes) सुरू केल्या आहेत . मात्र, घरकुलाच्या बांधकामासाठी तिसऱ्या हप्त्याचा चेक काढण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.

    अकोला (Akola). आर्थिक दुर्लभ आणि मागासवर्गीय समाजातील (economically deprived and backward communities) नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून सरकारने विविध घरकुल योजना (housing schemes) सुरू केल्या आहेत . मात्र, घरकुलाच्या बांधकामासाठी तिसऱ्या हप्त्याचा चेक काढण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारणाऱ्या खडकी टाकळी उपसरपंचासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.

    दिलीप दौलत सदांशिव, अमित युवराज शिरसाट, सुधीर मनतकार व योगेश अरुण शिरसाट अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. व्यवसायाने शेतमजूर असलेल्या तक्रारदार यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे जिओ टॅगिंग करून तिसऱ्या हप्त्याचा चेक काढण्यासाठी तक्रारदारास अमित युवराज शिरसाट याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती त्याने अडीच हजार रुपये लाच स्वीकारली. तसेच अन्य आरोपींनी त्यास समर्थन दिले.

    व्यवसायाने शेतमजूर असणाऱ्या खडकी टाकळी येथील 42 वर्षीय व्यक्तीने घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकामही सुरू केले असून घराचे जिओ टॅगिंग करून तिसरा हप्ताचा धनादेश देण्याची विनंती या शेतमजुरांनी खडकी टाकळी येथील उपसरपंच दिलीप दौलत सदाशिव (५२), आगर येथील ग्रामीण गृह निर्माण अभियंता अमित सिरसाट (२६), अकोला पंचायत विभागातील लिपिक सुधीर मनातकार (३५) आणि अमाणतपुर येथील रोजगार सेवक योगेश सिरसाट (२९) त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पाच हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

    यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष 21 जून रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्नही झाले. त्यानंतर आगर येथील कंत्राटी अभियंता यांच्या निवासस्थानी दोन हजार पाचशे रुपयांची लाच घेताना यामधील उपसरपंच दिलीप सदाशिव कंत्राटी अभियंता अमित शिरसाट व रोजगार सेवक योगेश शिरसाट या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

    तर सुधीर मनतकार याचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शरद मेमाने, अन्वर खान, संतोष दहीहंडे आदींनी केली आहे.