लपूनछपून सुरू होती गांजाची शेती; लाखो रुपयांचे मादक पदार्थ जप्त

अकोला येथील पिंजर पोलिस ठाण्यांतर्गत महान येथील पेट्रोलपंपाच्या मागे एका शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली होती. विशेष म्हणजे यातील एक गांजाचे झाड 10 फूट उंच वाढले तरी पोलिसांना याची कल्पनाही नव्हती.

    अकोला (Akola).  पिंजर पोलिस ठाण्यांतर्गत महान येथील पेट्रोलपंपाच्या मागे एका शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली होती. विशेष म्हणजे यातील एक गांजाचे झाड 10 फूट उंच वाढले तरी पोलिसांना याची कल्पनाही नव्हती. मात्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी छापा मारून गांजाची शेती उघडकीस आणली. त्याप्रमाणे लाखो रुपये किमतीचे मादक द्रव्य जप्त करण्यात आले.

    महान येथील सलीम खान जब्बार खान यांच्या घरातून 7 किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 70 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे जप्त केलेल्या गांजाच्या झाडांची किंमत अंदाजे 70 हजारांच्या आसपास आहे. या कारवाईनंतर महान परिसरातील गांजाच्या रॅकेटला सुरुंग लागल्याची चर्चा आहे.

    महान येथील सलीम खान व तस्लिमा खान हे दोघे लाखो रुपयांचा गांजा दररोज विकत असल्याची गुप्त माहिती एटीएसचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यानंतर पाटील यांनी सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईपूर्वी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. या कारवाईत 348 दारूच्या बाटल्या मिळाल्या असून त्याची किंमत 10 हजार रुपये आहे. एकूण 1 लाख 38 हजार 88 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.