अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी ; काव्यात्मक रचनेत अमोल मिटकरींची खोचक टीका

अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणत भाजपची (BJP) कबर खोदायला या महाविकास आघाडीने सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली.

अकोला : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक ( Graduate and Teacher Constituency Elections) निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, अशी काव्यात्मक प्रतिक्रिया (Response) दिली आहे. त्याचबरोबर भाजपचेच (BJP)  अहंकारी नेतेच भाजपला कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल, अशी खोचक टीकाही (Criticize) अमोल मिटकरींनी केली आहे.

भाजपवर हल्लाबोल

अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणत भाजपची कबर खोदायला या महाविकास आघाडीने सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

महाविकासआघाडीच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून यावेळी एका पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. त्यात पाचही जागा आम्ही स्वाभिमानाने जिंकू, अजित पवारांनी असे सांगितले होते. आता महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. आजपासून भाजपच्या अदप पथनाला सुरुवात झाल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, निवडून आलेल्या पदवीधर आणि शिक्षक महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे मिटकरींनी अभिनंदन केलं असून मतदारांचेही आभार मानले आहेत.