
शिक्षण राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पदाचा गैरवापर करत पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्हापरिषदेमध्ये 1 कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर वंचितकडून लावण्यात आला आहे(Embezzled Rs 1 crore 95 lakh by misusing the post; Complaint lodged with police against Minister of State Bachchu Kadu).
अकोला : शिक्षण राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पदाचा गैरवापर करत पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्हापरिषदेमध्ये १ कोटी ९५ लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर वंचितकडून लावण्यात आला आहे(Embezzled Rs 1 crore 95 lakh by misusing the post; Complaint lodged with police against Minister of State Bachchu Kadu).
बोगस कागदपत्र तयार केल्याचा आरोप करत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी कडू यांच्या विरोधात तक्रार केली. तक्रारकर्त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अकोला जिल्हा नियोजन समितीने वार्षीक आराखडा तयार करताना मागविलेल्या प्रस्तावानुसार, १० मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता.
जिल्ह्यातील तीन रस्ते जे मुळात शासनाच्या लेखी अस्तित्वातच नाही व ज्यांना ग्रामीण रस्ते म्हणून शासनाकडून कोणताही क्रमांक दिला नाही, अशा रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियतव्यय मंजूर केला. जे रस्ते अस्तित्वातच नाही अशा रस्त्यांसाठी निधी मंजूर करून त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश काढणे, काम जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील असताना ते इतर यंत्रणांकडून करून घेण्यासाठी वळती करणे व शासन निधीची अपहार केल्याचा आरोप करीत पुंडकर यांनी ही तक्रार दिली आहे.