मी नाना आहे! कोणाला दबत नाही; स्वबळाचा दावा सोडलेला नाही

मनपा निवडणुकीच्या वेळी त्याबाबत रीतसर बोलूच. स्वबळाचा मी दिलेला आवाज बुलंदच आहे, तो कोणीच दाबलेला नाही, मी नाना आहे... कोणाला दबत नाही, अशा शब्दात स्वबळाचा दावा सोडलेला नाही, हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधोरेखित केले.

    अकोला (Akola) : काँग्रेस पक्ष (The Congress party) आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असे जाहीर केले होते, जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत त्यानुसार रणनीती आखली आहे. पक्षाची ही भूमिका आहे, ती वारंवार सांगण्याची गरज नाही. मनपा निवडणुकीच्या वेळी त्याबाबत रीतसर बोलूच. स्वबळाचा मी दिलेला आवाज बुलंदच आहे, तो कोणीच दाबलेला नाही, मी नाना आहे… कोणाला दबत नाही, अशा शब्दात स्वबळाचा दावा सोडलेला नाही, हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधोरेखित केले.

    स्थानिक स्वराज्य भवन येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, प्रभाग रचनेवरून आमचे कुठल्याच पक्षाशी मतभेद नाहीत, महापालिकांसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना जाहीर झाल्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला. ही भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचविली आहे. ती मान्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी व कामगारविरोधी कायद्यांच्या विरोधात देशभर आंदोलन पेटले आहे. सोमवारी भारत बंदची हाक दिली असून मी अकोल्यातील बंदमध्ये सहभागी होईन, अशी माहिती दिली.