
संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याने मनोज हरीराम शर्मा, वय 22 वर्षे, शास्त्रीनगर शासकीय दूध डेअरीच्या अशी ओळख दिली. इतकी मोठी रोकड मिळाल्याबद्दल आणि ती कोणत्या उद्देशाने रेल्वेने पाठविली होती. याबद्दल कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत.
अकोला (Akola) : अकोला रेल्वे स्थानकावर (Akola railway station) रेल्वे सुरक्षा दलाने (Railway security forces) मोठी कारवाई करत हवाल्याची 43 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली (seize) आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी विदर्भ एक्सप्रेस (the Vidarbha Express) अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचताच रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)ची चमू बोगी क्रमांक ‘बी-4’मध्ये शिरली. तपासणी दरम्यान एका व्यक्तीकडे रक्कमेचं भलं मोठं घबाड (a large amount of money) आढळून आलं.
बुधवारी 18 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक B4 मधील अज्ञातप्रवासी 43,003,00 रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती आरपीएफला मिळाली. आरपीएफ कुरियरच्या माध्यमातून हवालाची रक्कम नेणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी कर्मचारी बी. आर. अंभोरे यांना माहिती देत लक्ष्मीनारायण यांना संशयितावर नजर ठेवण्यास सांगितले, त्यानंतर अंभोरे यांनी संशयिताला लक्ष्मीनारायणच्या मदतीने पकडले. त्यानंतर त्याला काळ्या रंगाची जड पिशवी घेऊन आरपीएफ पोलीस स्टेशन अकोला येथे आणण्यात आले.
या संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याने मनोज हरीराम शर्मा, वय 22 वर्षे, शास्त्रीनगर शासकीय दूध डेअरीच्या अशी ओळख दिली. इतकी मोठी रोकड मिळाल्याबद्दल आणि ती कोणत्या उद्देशाने रेल्वेने पाठविली होती. याबद्दल कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत आणि त्याने ही रोकड स्वतःची किंवा त्याच्या मालकाची असल्याबद्दल कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रे सादर केली नाहीत. या बाबतीत आयकर विभागाशी संपर्क करण्यात आला आहे.
या प्रकरणात जीआरपी अकोलाला संशयितासह पंचनामासाठी सांगितलेली एकूण रक्कम 43,00,300 रुपये जीआरपीकडे देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता जीआरपीकडे सोपवण्यात आला आहे. अश्या प्रकारे हवालाच्या पैश्यांची हेरफेर अनेकवेळा होत असते, मात्र प्रत्येकवेळी सुगावा न लागल्याने त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळत नाही. मात्र अकोल्यातील आरपीएफ पोलिसांनी गुप्त माहितीवरून वेळीच सावधगिरी बाळगत हवाल्याची ही मोठी रक्कम ताब्यात घेतल्याने हवळखोरांचे धाबे दणाणले आहेत.