
तिचे शनिवारी दुपारी अकोल्यात आगमन झाले. यावेळी क्रीडा प्रेमींनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. यावेळी अकोला बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनीचे राज्य प्रशिक्षक सतिश भट, डॉ. शर्मा आणि पलकचे आई-वडील प्रामुख्याने उपस्थित होते. हार घालून व मिठाई भरवून तिचे स्वागत झाले.
अकोला : अकोल्याची बॉक्सर पलक अजय-निशा झामरे हिने जॉर्डन येथे देशाचे नाव उंचावले. जॉर्डनमध्ये संपन्न झालेल्या ज्युनिअर एशियन बॉक्सिंगच्या अंतिम फेरीमध्ये तिने ४८ किलो वजन गटामध्ये रौप्य पदकावर मोहोर उमटवली. तिचे शनिवारी दुपारी अकोल्यात आगमन झाले. यावेळी क्रीडा प्रेमींनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. यावेळी अकोला बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनीचे राज्य प्रशिक्षक सतिश भट, डॉ. शर्मा आणि पलकचे आई-वडील प्रामुख्याने उपस्थित होते. हार घालून व मिठाई भरवून तिचे स्वागत झाले.
यावेळी क्रीडा प्रबोधिनीचे पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पलक अकोला येथील प्रभात किड्सची विद्यार्थिनी आहे. ती मागील ६ वर्षांपासून बॉक्सिंगचा सराव करीत आहे. आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर तिने पदकाची कमाई केली आहे. रोहतक हरियाणा येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून तिने एशियन स्पर्धेच्या भारतीय संघात स्थान निश्चित केले होते. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होते आहे. तसेच, तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन केले जात आहे.