विनयभंग करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला की, पीडित मुलीच्या आईने पो. स्टे. ला दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अमोल पाटोळे याने 3 मार्च रोजी पीडितेला भाजी देतो चल असे म्हणून घरी घेऊन गेला आणि...

    अकोला/अकोट (वा.) अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी फेटाळला. हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत खंडाळा येथील अमोल पाटोळे याने दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

    या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला की, पीडित मुलीच्या आईने पो. स्टे. ला दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अमोल पाटोळे याने 3 मार्च रोजी पीडितेला भाजी देतो चल असे म्हणून घरी घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलगी ओरडल्याने विक्की पाखरे याने दरवाजा लोटला त्यामुळे मुलगी घराबाहेर पडली. ती घरी गेल्यावरही आरोपी तिच्या मागे गेला तेव्हा भीतीने ती तिच्या काकांकडे गेली व तिने हकीकत सांगितली. या प्रकरणात तपास सुरू आहे. तसेच आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज रद्द करण्याची विनंती अॅड. देशमुख यांनी न्यायालयाला केली व ती मान्य झाली. आरोपी हा 3 मार्चपासून जिल्हा कारागृहात आहे.