प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अनेकदा लांबपल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची एसटी बसला मागणी असते, मात्र बसेस कमी असतात तर काहीवेळा ग्रामीण भागात सोडण्यासाठी बसेस कमी उपलब्ध असतात. यावर तोडगा काढण्याचा महामंडळाचा विचार असून येत्या काळात महामंडळातर्फे 700 नवीन बसेस येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

    अकोला (Akola).  अनेकदा लांबपल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची एसटी बसला मागणी असते, मात्र बसेस कमी असतात तर काहीवेळा ग्रामीण भागात सोडण्यासाठी बसेस कमी उपलब्ध असतात. यावर तोडगा काढण्याचा महामंडळाचा विचार असून येत्या काळात महामंडळातर्फे 700 नवीन बसेस येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यामुळे प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होण्यास मदत होईल.

    यामध्ये 500 बसेस साध्या डिझेल प्रकारातील असतील तर 150 बसेस विनावातानुकूलित ‘शयनयान कम आसन’ प्रकारातील तर 50 बस सीएनजी इंधनावर धावणाऱ्या राहणार आहेत. एसटी महामंडळाकडे सध्या 15,800 बसेसचा ताफा आहे. सध्या एसटीला अजून दोन हजार बसेसची गरज आहे. एसटीकडे परिवर्तन प्रकारातील लाल रंगाच्या बसची अधिक संख्या असून त्यानंतर शिवशाही, अश्वमेध, शिवनेरी, हिरकणी आदी प्रमुख प्रकारच्या बसेस आहेत.

    पहिल्या टप्प्यात एसटी महामंडळ 700 नवीन बसेसची खरेदी करणार आहे. या बस नव्या प्रदूषण नियमांप्रमाणे बीएस-6 इंजिन प्रकारातील असतील. यात डिझेल इंजिनावर धावणाऱ्या साध्या 500 बसेस असतील. तर 150 बसेस या विनावातानुकूलित ‘शयनयान कम आसन’ बसेस असतील. तर 50 बसेस सीएनजीवर धावणाऱ्या राहणार असल्याची माहिती आहे.